थांबा! आणखी सुधारणा पहा ...

डेव्हलपर्स, इंटिग्रेटर्स आणि डिझायनर्ससाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि सुधारणा!

  • Mod_stats च्या फ्रंटएन्डसाठी इव्हेंट हुक: हे मॉड्युल आता कोणताही स्त्रोतावरून सानुकूल आकडेवारीसह विस्तृत केले जाऊ शकते #15138**
  • मेनू आयटमच्या चित्रासाठी CSS class वापरा: यामुळे मेनू आयटमचे चित्र विविध प्रकारे दाखवण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतात #16456
  • टॅग्ज: कॅटेगरी ब्लॉग मेनू तयार करताना कॅटेगरी आणि टॅग्स निवडून, आपल्या आर्टिकल्स - कॅटेगरी मोड्युल मध्ये टॅग्स प्रमाणे माहिती दाखवता येईल #16945
  • बॅकएन्ड मेनू: आपले मेनू मॉड्युल्स टॅग्सद्वारा ऍडमिनच्या भाषेनुसार दाखवता येतील #17215
  • मेटा टॅग सुधारणा: एकाच टॅगचे विविध प्रकार समाविष्ट करता येतात #16583
  • संग्रहित लेख मेनू प्रकार: आपण आता दिलेल्या कॅटेगरीद्वारे आपले संग्रहण फिल्टर करता येतात. #15184
  • बॅकएंड मेनू कस्टमाईसशन: आपले स्वत: चे प्रीसेट मेनू तयार करणे, आपले कस्टम मेनू प्रीसेटमधे रूपांतरित करणे आणि लेआउट ओव्हरराईड करणे शक्य आहे #16451
  • नवीन फिल्टरिंग पर्याय: पालक मेनू आयटम्सद्वारे आपली मेनू आयटमची सूची फिल्टर करता येते #17060
  • रिडायरेक्ट प्लगिन: एक नवीन मोडल विंडो आपल्याला एका क्लिकमध्ये प्लगइन सेटिंग्ज संपादित करू देते. #16844
  • सेशन हँड्लर: Joomla! 3.8 रेडिस सेशन आधारीत आहे. #15390

** वरील वैशिष्ट्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी github issue क्रमांकावर क्लिक करा.

Joomla! 3.7 ची प्रमुख वैशिष्ट्ये

joomla 3.7 कस्टम फिल्ड्स

कस्टम फिल्ड्स

आपण लिहिलेल्या मजकूराची उपयुक्तता कस्टम फिल्ड्स वापरून वाढवा!

आपली साईट वापरणाऱ्या लोकांना तेथील लेख, वापरकर्ते आणि संपर्कांमधील अतिरिक्त विशेषता पाहण्याची इच्छा आहे? आपण त्यांना संपूर्ण साईट कशी दिसणार आहे हे कस्टम फिल्ड्सद्वारा सहज दाखवू शकाल.
१५ प्रकारचे कस्टम फिल्ड्स उपलब्ध आहेत, जसे की लिस्ट्स, टेक्स्ट फिल्ड्स, तारीख इ. साइट प्रशासक वरील प्रकारची फिल्ड्स लेख, वापरकर्ते आणि संपर्कांसाठी तयार करू शकतील. लेख संपादित करताना, फील्ड्स वेगळ्या टॅबमध्ये दर्शविले जातात आणि भरले जाऊ शकतात. फिल्ड गट वापरून प्रत्येक कस्टम फिल्ड्सचा गट वेगळ्या टॅबमध्ये उघडता येऊ शकतो. एसीएल, बहुभाषीय, लेआउट्स, आणि इतर अनेक पर्याय आपल्या गरजेनुसार वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
काही प्लगइन इव्हेंट्सद्वारे, तृतीय पक्ष एक्सटेन्शन डेव्हलपर्स कस्टम फिल्ड्स सहजपणे त्यांच्या एक्सटेन्शनमध्ये वापरू शकतील. ते त्यांच्या एक्सटेन्शनचा एक भाग असल्यासारखेच दिसतील, जसे की कॅटेगरी, टॅग्स, हिस्टरी. नवीन प्लगइन गट, "फील्ड्स", आपल्याला नवीन प्रकारचे फील्ड तयार करण्याची परवानगी देतो. उदाहरणार्थ, एखादी ट्विटर प्लगइन दिलेल्या हॅशटॅगच्या लेखामध्ये ट्वीट्स दर्शवू शकते.

इंटिग्रेटर डिझायनरडेव्हलपर
Joomla 3.7 बहुभाषी

बहुभाषिक साइट्स

बहुभाषिक वेबसाइट तयार करणे आणि व्यवस्थापित करणे आता खूपच सोपे आहे!

बहुभाषिक असोसिएशनमुळे बहुभाषिक साईट तयार करणे व व्यवस्थापित करणे सहज शक्य झाले आहे. नवीन बहुभाषिक असोसिएशन कॉम्पोनंट आपल्याला आपल्या सर्व मजकूराचे भाषांतर एकाच इंटरफेसमधून करू देतो. तृतीय पक्ष एक्सटेन्शन डेव्हलपर्स त्यांची एक्सटेन्शन्स बहुभाषिक सुसंगत अशी तयार करू शकतील ज्यायोगे त्यातही बहुभाषिकता येईल.
नवीन भाषा पॅकेज इन्स्टॉल केल्यावर मजकुराची भाषा, भाषा व्यवस्थापन विभागात आपोआप तयार होईल. आपल्याला ती फक्त प्रकाशित लागेल! एवढेच नाही तर आता आपण आपले भाषांतरित मजकूर फक्त एका भाषा चिन्हावर क्लिक करून संपादित करु शकता. आपल्या मेनू आयटमच्या असोसिएशन्स टॅबमधून आपला मजकूर निवडा, संपादित करा आणि काढून टाका...

इंटिग्रेटर डेव्हलपर
Joomla 3.7 सुधारित कार्यपद्धती

सुधारित कार्यपद्धत

आपल्या मेनू आयटमची आणि आपल्या सामग्रीची एकत्र निर्मिती करा!

सामग्री प्रथम हे आमच्या कंटेंट मॅनेजमेंट सिस्टमचे वैशिट्य आहे. यामुळे कॅटेगोरी तयार करून मग लेख आणि नंतर मेनू याच क्रमाने जावे लागते. त्यानंतर मेनू आयटम कॅटेगोरी अथवा लेखाशी जोडता येतो. Joomla! 3.7 हे अधिक जलद आणि खूपच सहज बनविते. आता आपण या तीनही गोष्टी, मेनू आयटम, लेख आणि कॅटेगोरी एकाच तयार करू शकता.
लेखासाठी मेनू आयटम तयार करताना, क्रिएट बटणावर क्लिक करा, आपला लेख लिहा, सेव्ह करा आणि त्यानंतर कॅटेगरी तयार करा...
आपण संपर्क, न्यूझफ़ीड आणि मेनू आयटम एलिअस देखील तयार करू शकता.

आपण या लँडिंग पृष्ठाचे भाषांतर करू इच्छिता? फक्त येथे लॉग इन करा !